‘सर्वव्यापी आणि सर्वपरिचित अशा प्रकाशामागे कल्पना करता येणार नाही एवढे सखोल आणि विस्तृत विज्ञान दडलेले आहे. भौतिकशास्त्रातील अनेक क्रांतिकारक सिध्दांतांची गुरुकिल्ली प्रकाशाच्या अभ्यासातून सापडली. घरातील वीज, हातातील मोबाईल, दूरचित्रवाणीवरील प्रतिमा या सा-यांच्या स्वरूपात हे प्रकाशविज्ञान आता तर आपल्या रोजच्या आयुष्याला वेढून राहिले आहे. प्रकाशाशी निगडित विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा व्यापक पट उलगडून ठेवणारा सुबोध शैलीतील हा प्रकाशवेध वाचकांना नक्कीच उद्बोधक वाटेल. डॉ.आतिश दाभोलकर डिरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सायंटिफीक रिसर्च, पॅरीस आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक प्रकाशाने निरनिराळया संस्कृतींच्या आणि समाजांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. अतिशय प्रभावीपणे पांढरा प्रकाश देणा-या एलईडीसारख्या अनेक नव्या शोधांमुळे यापुढेही प्रकाशाच्या साहाय्याने शाश्वत विकास साधता येईल. यामुळेच एकविसाव्या शतकात प्रकाशाबद्दल जाणून घेणे प्रत्येकाला अतिशय आवश्यक आहे. डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांचे हे पुस्तक वाचकांना प्रकाशविज्ञान आणि प्रकाशतंत्रज्ञानाची समर्थपणे ओळख करून देणारे ठरेल, यात शंकाच नाही. डॉ.सिडने परकोविट्झ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक आणि विज्ञान साहित्यिक ‘
Reviews
There are no reviews yet.