केनेथ अँडरसन हा पट्टीचा शिकारी. मात्र त्याची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा अन् बिबळ्यांचा. जंगलाशी नाळ जोडली गेलेला हा शिकारी जंगल वाचायला तर शिकलाच; शिवाय जंगलात राहणाऱ्या वन्य जमाती, त्यांची जीवनशैली, रूढी अन् प्रथा, जगण्याची साधनं या साऱ्यांचंही त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पंचक्रोशीत दहशत माजवणाऱ्या नरभक्षकांना हिमतीनं अन् हिकमतीनं टिपणाऱ्या या निष्णात शिकाऱ्यानं सांगितलेल्या स्वानुभवाच्या थरारक शिकारकथा नरभक्षकाच्या मागावर.
Reviews
There are no reviews yet.