सोनिया गांधी (Soniya Gandhi)

Shop

सोनिया गांधी (Soniya Gandhi)

500.00

भारतीय राजकारणाचा झंझावात सोनियाच्या वैयक्तिक जीवनातही उलथापालथ घडवतो. या वादळाला धैर्यानं सामो-या जाणा-या सोनियाचं हे ललित चरित्र… सोनिया गांधी

Placeholder

500.00

Add to cart
Buy Now
Compare

‘इटलीमधील छोट्याशा खेड्यात, एका मध्यमवर्गीय बांधकाम व्यावसायिकाच्या घरात लहानाची मोठी झालेली सोनिया मायनो इंग्लिश शिकायला केंब्रिजला येते अन् सुरू होते एक अद्भुत प्रेमकथा. राजीव गांधी नावाचा रुबाबदार, हसतमुख राजकुमार प्रथमदर्शनी सोनियाच्या प्रेमात काय पडतो, तिला लग्नाची मागणी काय घालतो आणि भारत देश नकाशावरसुध्दा ठाऊक नसणारी सोनिया मायनो गांधी घराण्याची सून होऊन दिल्लीला येऊन काय थडकते! सगळंच अविश्वसनीय! एखाद्या स्वप्नासारखं! एका क्षणात सोनिया संपूर्ण भारताचा आकर्षणविषय बनते. भारतासारख्या महाकाय देशाचा गुंतागुंतीचा कारभार तिच्या घरून चालवला जात असतो. या देशाच्या कर्त्याकरवित्या इंदिरा गांधी तिच्या सासूबाई. जगभरचे राजकारणी तिच्या घरी पायधूळ झाडत असतात. सोनियाच्या पूर्वायुष्याची सगळी परिमाणंच बदलून जातात. स्वप्नातही कल्पना केली नसेल, असं वलयांकित जीवन ती जगू लागते. पण या वलयाला असते राजकीय अस्थिरतेची काळी किनार… बांगला देशचं युद्ध, आणीबाणी, इंदिरा गांधींचा निवडणुकीतील पराभव आणि पुनश्च सत्ताग्रहण, सुवर्णमंदिरावरील कारवाई, त्यातून घडलेली इंदिराजींची हत्या, राजीवचा राजकारण-प्रवेश, तामीळ वाघांच्या दहशती कारवाया आणि अंतिमत: राजीव गांधींची हत्या! भारतीय राजकारणाचा झंझावात सोनियाच्या वैयक्तिक जीवनातही उलथापालथ घडवतो. या वादळाला धैर्यानं सामो-या जाणा-या सोनियाचं हे ललित चरित्र… सोनिया गांधी ‘

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सोनिया गांधी (Soniya Gandhi)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X