मनगंगेच्या काठावर (Mangangechya kathavar)

मनगंगेच्या काठावर (Mangangechya kathavar)

समस्यांनी भरलेलं व्यक्तिगत आयुष्य आणि राजकीय, सामाजिक उलथापालथींनी भरलेला आसाम यांच्या दुहेरी पेडांनी विणलेली आत्मकथा. ‘

250.00

250.00

Add to cart
Buy Now

ही आहे एका कर्तबगार पत्रकार स्त्रीची खरीखुरी जीवनकथा. सबिता गोस्वामी यांची आत्मकथा, दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा पती, पदरात दोन छोटया मुली, दुरावलेलं माहेर अन् दुखावणारं सासर. अस्तित्वाच्या झगडयासाठी कुटुंबाला सावरण्यासाठी ही एकटी बाई कणखरपणे उभी राहिली, पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरली. त्यावेळी सभोवतीचा आसाम पेटलेला होता. आंदोलनं, उल्फा अन् गणपरिषदेच्या चळवळी, दहशतवाद्यांच्या हिंसक कारवाया यांच्या ज्वाला भोवती धडधडत होत्या. हा सारा वणवा, त्याचं विवेचन, त्याचे संभाव्य परिणाम यासंबंधी बीबीसी, ब्लिट्झ, द वीक अशा नामवंत वृत्तसंस्थांसाठी सबिता गोस्वामींनी केलेलं लिखाण म्हणजे आसामची चार दशकांची बखरच. समस्यांनी भरलेलं व्यक्तिगत आयुष्य आणि राजकीय, सामाजिक उलथापालथींनी भरलेला आसाम यांच्या दुहेरी पेडांनी विणलेली आत्मकथा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनगंगेच्या काठावर (Mangangechya kathavar)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0