मराठी गझलेच्या प्रदेशात मध्यरात्रीही तळपळणारा सूर्य म्हणजे सुरेश भट! त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन नंतर अनेक कवी गझलांकडे वळले. अशा भटांनंतरच्या पिढीतील एक सुप्रसिद्ध गझलकार दीपक करंदीकर म्हणजे जणू सुरेश भटांचे गंडाबंध शागिर्दच. ‘तीक्ष्ण तीरासारखा घुसलास तू ! शूर योद्ध्यासारखा लढलास तू ! घे सलामी आमुची गझलेतुनी गझलसम्राटा, अमर झालास तू !’ असे आपल्या गुरूचे वर्णन करणार्या दीपक करंदीकरांना अनेक प्रसंगांमधून सुरेश भटांचा सोनेरी सहवास लाभला. त्या अविस्मरणीय क्षणचित्रांची साठवण
Reviews
There are no reviews yet.