शिदोरी म्हणजे संचित. माणसाच्या सोबत असलेली हक्काची मीठ – भाकर. आपल्या आयुष्यातील उत्कट, कातर अनुभवांनी दिलेलं शहाणपण. जगण्याच्या प्रवासात आलेल्या घटनांनी दिलेली सार्थ शिकावं, हीसुद्धा शिदोरीच.
कधी संदेशाच्या रूपात, कधी आशीर्वादाच्या रूपात.
शिदोरी भूक भागवतेच, पण ती तुम्हाला आधार देते, बळ देते,
ऊर्जा देते, चैतन्य देते. विचारांची शिदोरी पडताना सावरते, गोंधळताना स्थिर ठेवते, निराशेत मनावर फुंकर मारते आणि अतिविश्वासाच्या, अतिउन्मादाच्या वेळी आपल्याला लगामही घालते. हातांचे पंख करण्याची ताकद शिदोरीत असते.
Reviews
There are no reviews yet.