माणसाची स्वत:ची कहाणी त्याच्या एकटयाची नसते. त्याच्या जीवनाचा भाग बनलेल्या व्यक्तींची अन् सभोवतालच्या परिसराचीही ती कहाणी असते. मराठवाडयात जन्मलेल्या, लहानाचा मोठा झालेल्या एका संवेदनशील वाङ्मय-अभ्यासकाची ही कहाणी. त्याची एकटयाची नाही, तर मराठवाडयाची अन् तिथल्या माणसांची कहाणी. एका बाजूला निजामी राजवटीचं मध्ययुगीन वातावरण, दुसरीकडे उर्वरित मराठी मुलखापासून नाळ तुटलेली. तरीही दीर्घ काळापासून चालत आलेल्या आपल्या सांस्कृतिक अन् वाङ्मयीन परंपरांचा वारसा अभिमानानं जपणारा मराठवाडा अन् तिथले मराठीभाषक. लेखकाच्या निमित्तानं साकारलेली त्याच्या जगाची ही कहाणी… लोभस एक गाव – काही माणसं
Reviews
There are no reviews yet.